पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वारंवार अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी आता मोठे पाऊल उचलले आहे. या मार्गावर आता अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातानंतर शासन-प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे अपघात टळणार आहे अन् लाख मोलांचे जीव वाचणार आहे. या महामार्गावर नियम तोडणे चालकांना चांगलेच महागात पडणार आहे, कारण त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञान असणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्याय. यासाठी लवकरच सर्व्हेला सुरुवात होणार आहे.
. नेमके काय करणार ?
. मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत .
. प्रत्येक वाहना वर लक्ष देण्यात येणार आहे
. वाहनांचा वेग तपासण्यासाठी ‘अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे