शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.महाराष्ट्राला ६३ वर्षे झाली. मराठी माणसांनी मुंबई ही राजधानी लढाई करुन मिळवली ती आंदण मिळालेली नाही. १ मे सुरु झाल्यापासून तिथं सजावट केली जाते पण काल सरकारकडून किंवा महापालिकेकडून कसलिही सजावट करण्यात आली नव्हती. तिथं सजावट शिवसैनिकांनी केली,असं उद्धव ठाकरे म्हणाले.एकनाथ शिंदे हुतात्मा स्मारकाला मानवंदना करायला गेले होते. ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यामुळं तुम्ही मुख्यमंत्री बनला. ज्या भांडवली प्रवृत्तीला मुंबई महाराष्ट्राला मिळू नये असं काही जणांना वाटत होतं. आपल्याला मुंबई कशी मिळाली हे सांगितलं पाहिजे. त्यावेळी संपूर्ण गिरणगाव पेटलं होतं, लक्ष्मी कॉटेजवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला होता. गिरणी कामगार, कामगारांनी लढा दिला. त्यावेळी महिलांनी रस्त्यावरुन पोलिसांना गोळ्या घालण्याचं आव्हान दिलं. महिलांमध्ये जी जिद्द होती ती घ्या, असा सल्ला एकनाथ शिंदेंना ठाकरे यांनी दिलं.वज्रमुठीचा हिसका तुम्ही पाहिला असेल. कसब्याची निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा अंधेरीची निवडणूक असेल मविआच्या वज्रमुठीच्या ताकदीनं विजय मिळाला आहे. बारसू महाराष्ट्रातील भाग आहे. तिथं बोलणार आहे. बारसूमध्ये ६ मे रोजी सकाळी जाणार नंतर महाडला सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.