7.4 C
New York

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात …

Published:

राज्यातील जनतेसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. ही बस दरीत कोसळल्याने 12 ते 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलं आहे. अजूनही काही लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ पहाटे 4च्या सुमारास ही दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. पहाटे चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. चालकाचा ताबा सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याने बसमधील प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी गाढ झोपेत होते, अचानक बस आदळल्याने या प्रवाशांना जाग आली. अनेक प्रवाशांना बस आदळल्याने मुक्का मार लागला आहे. बस दरीत कोसळताच वाचवा वाचवाचा आक्रोश सुरू झाला. रडारड सुरू झाली. या रडारडीचा आवाज ऐकून आजपासचे ग्रामस्थ दरीच्या दिशेने धावले. त्यानंतर या प्रवाशांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, अंधार असल्याने मदतकार्यात मोठी अडचण येत होती.

Related articles

Recent articles

spot_img