रश्मी ठाकरे या सौम्य स्वभावाच्या पण संकट आल्यावर कणखर बाणाही त्यांच्याकडे आहे. शिवसैनिकांना ठाकरे कुटुंब आणि मातोश्री हे हक्काचे, आदराचे स्थान वाटते. उद्धव ठाकरेंचं आजारपण असो वा एकनाथ शिंदेंचं बंड… चांगल्या आणि वाईट काळात रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवसेनेचं अख्खं कुटुंब मोडकळीस आलेलं असताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत. अशातच मातोश्रीवरील कारभारानंतर स्वत: रश्मी ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये मेळावा घेणार असल्याची माहिती आहे. कोकण आणि मालेगावात उद्धव ठाकरेंची विराट सभा नुकतीच पार पडली. सर्वसमावेशक हिंदुत्व अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत त्यांनी शिवसैनिकांना साद घातली. पक्ष बांधणी आणि मजबुतीसाठी उद्धव ठाकरेंनंतर आता महिला पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ आवळण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात येणार आहेत, अशी माहिती आहे.
नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे महिला आघाडीत मोठा चेहरा नाही. माजी नगरसेविकाच नाशिकची महिला आघाडी सांभाळत होत्या. मालेगाव येथील सभेत काही महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंसोबत असलेली लोक फोडण्यासाठी शिंदे समर्थकाकंडून नाशकात कसून मेहनत केली जातेय. संजय राऊतांनी अनेकदा तळ ठोकूनही पक्षातील पडझड रोखण्यात म्हणाव तसं यश आलेलं दिसत नाही. त्यामुळं नाशकातील महिला आघाडीच्या बळकटीसाठी रश्मी ठाकरे यांचा महिनाअखेरीस मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. विस्कटलेली संघटनात्मक घडी बसवण्यासाठी मातोश्रीवर प्लॅनिंग सुरु आहे. नाशिक मधील पदाधिकाऱ्यांकडून महिलांच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आहे.
आता जिकेंपर्यंत लढायचं …..
Published: