8.2 C
New York

मराठी सिनेमा संपवला जातोय”

Published:

ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,”टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही”. माझा सिनेमा आवडला नसेल तर लोकांनी तसं स्पष्ट सांगावं. तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस. त्या दिवशी मी सिनेमा करण्याचं बंद करेन, असं म्हणताना भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले आहेत. भाऊराव कऱ्हाडे पुढे म्हणाले,”आमचा सिनेमा चांगला आहे असं मी म्हणत नाही. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना शो रद्द करणं कितपत योग्य आहे. पिंपरी चिंडवडमध्ये या सिनेमाचे दोन शो होते. सिनेमागृह तुडुंब भरलेलं असतानाही शो वाढवून दिला नाही. हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षक मागणी करत होते. त्यामुळे मी त्या थिएटर मालकांकडे विचारपूर केली. त्यांनी मला सांगितलं की,या सिनेमाचा एकच शो लावण्याचं वरुन प्रेशर आहे. माझ्या सिनेमाला मिळालेले शो प्राइम टाइममधील नसून ऑड टाइममधील आहेत. या सर्व गोष्टींचा मला सिनेमाच्या टीमला खूप त्रास होत आहे”

Related articles

Recent articles

spot_img