9.8 C
New York

कहाणी एका जहाजाची त्यांनी मुबंई दाखवली . . . .

Published:

मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.इ.स. 1830 साली मुंबईमध्ये दोन मोठ्या घटना घडल्या. यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलून गेला. मुंबईच्या विकासात कोकणचा सह्याद्री आडवा येत होता. सह्याद्रीच्या कड्यामुळे घाटावरील प्रदेश मुंबईपासून लांब पडला होता. बोरघाट हा त्यात प्रमुख अडसर होता. थळ आणि बोर येथे मोठ्या खिंडी होत्या. 1803 च्या काळात इंग्रज गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली आपल्या सैन्यासह पुण्याला गेला. त्यावेळी त्याने आपल्या सैन्याला जाण्यासाठी बोरघाटमध्ये छोटा रस्ता तयार केला. पण, तेथून फक्त खेचरांवरून माल नेण्याइतपत वाट होती. त्यामुळे तेथून होणारी वाहतूक जिकिरीची आणि खर्चिक होती. मेण्यातून हा घाट ओलांडण्यासाठी माणसाला शेकडो रुपये खर्च येत असे1809 साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने पश्चिम भारताची राजधानीचा मान मुंबईला दिला. बोरघाटात चांगला रस्ता बनवण्याची त्याने योजना आखली. कमीत कमी बैलगाड्या तरी जाव्यात इतका रस्ता असावा अशी त्याची इच्छा होती. मुंबईला चांगले दिवस आणण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल होते. पण, हा रस्ता होण्यासाठी 20 वर्ष जावी लागली. मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी 10 नोव्हेंबर 1830 रोजी खोपोलीपलीकडे असलेल्या बोरघाटातील रस्त्याचे उद्घाटन केले. मुंबईच्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांसोबत बैलगाड्यांमधून त्याने हा घाट पार केला. खोपोली ते खंडाळा हा साडे चार मैलांचा रस्ता अतिशय चिंचोळा होता. मात्र, या रस्त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतुक खर्चात लक्षणीय घट झाली.

Related articles

Recent articles

spot_img