शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि पवार कुटुंबाबद्दल धक्कादायक दावा केला आहे. अजित पवार यांनी आज एका मुलाखतीत आपण मुख्यमंत्री पदाबद्दल आता सुद्धा दावा करु शकतो, असं म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना घेऊन बंड पुकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबद्दलच्या चर्चांनी परिसीमा गाठल्यानंतर अखेर अजित पवार हे प्रसारमाध्यमांसमोर आले होते. त्यांनी आपण आयुष्यभर राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचं म्हटलं. पण शिवसेना नेते यांना आता अजित पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.जित पवार यांचा पुढे राज ठाकरे होणार आहे. त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध आहे. त्यांचा काटा काढला जातोय. राज ठाकरे बरोबर जे महाबळेश्वरमध्ये झालं तेच आज अजित पवारांसोबत होतंय. त्यांना कुटुंबाकडूनच बाहेर ढकलून दिले जात आहे”, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. शिवातारे यांनी केलेला दावा या सध्याच्या राजकीय घडामोडी आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिलं गेलं नव्हतं. त्यावेळी अजित पवार हे मंचावरुन निघून गेले होते. पक्षात आपल्याला डावललं जात असल्याची भावना अजित पवार यांची असल्याची चर्चा आहे. त्यातून ते थेट भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी आज विजय शिवातारे यांच्यावरही टीका केल्याची माहिती समोर आलीय. त्यावर शिवतारे यांनी त्यांना आपल्या कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत?” असा सवाल विजय शिवतारे यांनी केला. बारामतीमधील अनेक गाव आज दुष्काळग्रस्त आहेत, असंही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.
टीका अजित पवार यांच्यावर पण राज ठाकरे देखील दुखावतील …
Published: