एक अनार,दो बिमार’ही म्हण आपल्या सर्वांनाच माहित आहे,पण एक शर्यत पार पडल्यानंतर बक्षीसाच्या वाटपावरून असाच काहीसा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे, देशातील सगळ्यात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यती मध्ये बकासुर आणि महिब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी जिंकली. पण यानंतर ठार गाडी कोण घेणार यावरून तिढा निर्माण झाला आणि अखेर आयोजक असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी थेट दोन्ही मालकांना प्रत्येकी एक-एक थार गाडी देऊन टाकली आहे. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या भाळवणी मध्ये पार पडल्या आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडीसाठी बकासुर आणि महिब्या ही बैल जोडी पळाली आणि दोघांनीही थार गाडी आपल्या पदरात पाडली.दोन्ही बैलांची मालक वेगवेगळे त्यामुळे थार गाडी कोणाला मिळणार ? किंवा कोण घ्यायची ? हा प्रश्न आणि तिढा निर्माण झाला होता. शर्यत होऊन सहा दिवस …
रश्मी ठाकरे…. सौम्य स्वभावाच्या पण संकट आल्यावर कणखर बाणाही त्यांच्या अंगी आहे… त्यांच्या मितभाषी स्वभावाचा फायदा म्हणजे शिवसैनिकांना ठाकरे कुटुंब आणि मातोश्री हे हक्काचे, आदराचे स्थान वाटते. उद्धव ठाकरेंचं आजारपण असो वा एकनाथ शिंदेंचं बंड… चांगल्या आणि वाईट काळात रश्मी ठाकरे कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवसेनेचं अख्खं कुटुंब मोडकळीस आलेलं असताना उद्धव आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत. अशातच मातोश्रीवरील कारभारानंतर स्वत: रश्मी ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये मेळावा घेणार असल्याची माहिती आहे. नाशिकचा ढासळलेला बुरुज सावरण्यासाठी रश्मी ठाकरेंचा दौरा गेम चेंजर ठरणार का? हेच या व्हिडिओत पाहू.
Published: