भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगर पालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन.