मराठवाड्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज घडली. मागील 7 वर्षांपासून भगवान गडापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी भगवान गड परिसरातील भाजर्डी येथे हजेरी लावली. भागवान गडाच्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे यांनी जोरदार उपस्थित दर्शवली. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे राजकीय शत्रू आणि भाऊ असलेले धनंजय मुंडे हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून दुरावा निर्माण झाला होता. तो आजच्या कार्यक्रमातून मिटल्याचे दिसून आले. तसेच राजकारणातली लढाई विचारांची आहे. मात्र गडाच्या विकासासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आज भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला हजेरी लावली होती. भागवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे देखील तेथे उपस्थित होते. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्येही चांगलीच शेरेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं. पंकजा मुंडेंनी अहंकार थोडा कमी करावा असा सल्ला नामदेव शास्त्रींनी दिला.