7.4 C
New York

अजित पवार पक्षात आले तर आनंदच…

Published:

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासंदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपात जाणार, असा दावा केल्याने चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे आणि त्यातच आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच आणि आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. रामदास आठवले म्हणाले की, “अजित पवार भाजपात जातील असं मला वाटत आहे. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. त्यासोबतच आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती संधी आम्ही अजित पवारांना देऊ.” आठवलेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आदित्य ठाकरेंनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे पडले, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहेत. ते रडणार नाहीत. एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील. उद्धव ठाकरेंना कंटाळून ते गेले, अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार ताफा सोडून खासगी गाडीत बसून गायब झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझी तब्येत ठीक नव्हती, पित्ताचा त्रास झाला होता, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात आले. पहाटेच्या शपथविधीपासून ते आता पुन्हा मध्येच गायब झाल्याने चर्चा रंगली होती. त्यासोबत मोदींच्या डिग्रीसंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा सुरु झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीदेखील अजित पवार भाजपात जाणार असा दावा केला. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. अजित पवारांना आठवलेंनी देखील पक्षात येण्याची ऑफर दिली. यावर आता अजित पवार काय उत्तर? देतील हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Related articles

Recent articles

spot_img