एकनाथ शिंदे आमच्या घरी येऊन रडले होते, असं विधान आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात केलं. हा प्रसंग आज आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा उलगडून सांगितला आहे. आमच्या घरी म्हणजे मातोश्रीवर नव्हे तर वर्षावर २० मे रोजी एकनाथ शिंदे आले होते, असं . आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच, शिंदे पक्ष सोडणार असल्याची कुजबुज कानी येताच कारण विचारण्यासाठी ही भेट झाली होती. कशाला? कोणाला? घाबरून हा निर्णय घेत आहात असा सवालही केला, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचसह, महाराष्ट्रातील राजकीय बदलाचे संकेत असतील तर चांगलंच आहे, महाराष्ट्राचं भलं व्हावं. .असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. बंडखोरी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे घरी येऊन रडले होते, असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं. आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व घडामोडीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे ज्यादिवशी घरी येऊन रडले, त्यादिवशी नेमकं काय घडलं? याचा खुलासा केला. ‘मुंबई तक’च्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे म्हणाले, “नोव्हेंबर महिन्यात मी ग्लासगोला गेलो होतो. तिथे उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया होणार होती. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया तातडीने झाली. शस्त्रक्रियेनंतर पुढचा दीड-दोन महिन्याचा काळ उद्धव ठाकरे बबलमध्ये होते. ते कुणाला भेटू शकत नव्हते. त्यांचे हातपाय हालत नव्हते. तेव्हा मीही किमान पाच कोविड टेस्ट केल्यानंतर दोन-तीन तासांनी त्यांना भेटायचो.”