एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर बंड केलेल्या शिंदे यांनी सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला. आता मोठा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे.
एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’वर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरे यांनी बंडाआधी ‘मातोश्री’वर नेमकं काय घडलं ते सांगितलं. भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असे एकनाथ शिंदे यांनी मातोश्री निवासस्थानी येऊन सांगितले. त्यावेळी ते रडले होते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट …..
Published: