7.4 C
New York

बाबरी पाडली तेव्हा नेमकं काय घडलं ?

Published:

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण केला आहे.उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशिदीबाबत एक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण केला आहे. चंद्रकांत पाटील काल एका मुलाखतीत म्हणाले की, बाबरी पाडली तेव्हा तिथे शिवसैनिक नव्हते. या वक्तव्यानंतर शिवेसेनेचा ठाकरे गट चंद्रकांत पाटलांवर संतापला असून आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, बाबरी खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेले शिवसैनिक पवन पांडेदेखील चंद्रकांत पाटील यांच्यावर संतापले आहेत. पांडे म्हणाले की, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचं आहे. बाबरी मशीद भाजपाने नाही तर शिवसैनिकांनी पाडली. बाबरी मशीद सुरक्षित राहावी, असा प्रयत्न भाजपा आणि आरएसएसने केला. मी चंद्रकांत पाटलांना सांगू इच्छितो की, बाळासाहेब नोव्हेंबर महिन्यातच म्हणाले होते की, आम्ही प्रतिकात्मक कारसेवा करणार नाही. राजकीय पोळी भाजता यावी यासाठी भाजपा बाबरी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होती.

Related articles

Recent articles

spot_img