खरसुंडी हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यात आहे.लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खरसूंडी येथील श्री सिद्धनाथांची चैत्र यात्रा लवकरच सुरु होणार असून, सासनकाठी व पालखीचा मुख्य सोहळा सोमवार दिनांक 17 रोजी संपन्न होणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत व गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करीत पार पडणाऱ्या या सोहळ्याचे देशभर थेट प्रक्षेपण मुंबई एक्सप्रेस चॅनलच्या माध्यमातून केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहू न शकणाऱ्या देश-विदेशातील भक्तगणापर्यंत थेट प्रक्षेपण होणार आहे. यात्रेसाठी उपस्थित न राहू शकलेल्या भक्त जणांना महिलांना, वृद्धांना सोहळ्याचा घरबसल्या आनंद घेता येणार आहे .याबाबत बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेसचे नेते महेंद्र (आप्पा) लाड आणि शरद लाड म्हणाले .