शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स प्रचंड खालावल्याने मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन ला एक वर्ष पूर्ण होत आले आहे मात्र या बाबत कोणतीही कार्यवाही होत. मात्र हे सरकार बिल्डर कंत्राटदारांना जुक्टे माप देत आहे. दुसरीकडे या राज्याला पूर्ण वेळ पर्यावरण मंत्रीही नाही. याची दाखल घेत कार्यवाही करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबईत एकीकडे हवेचा दर्जा अत्यंत खालावत चालला आहे आणि दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील किशोर कुमार गार्डेन मध्ये पालिकेने व्यायाम, योगासने आणि खेळांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास घेणे कठीण होत चालले आहे याकडेही आदित्य ठाकरे यांनी सभागृहात लक्ष वेधले आहे. याची गंभीर दाखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला याची दाखल घेऊन पुढील उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
जुहू उद्यानावरील निर्बंध उठाव…
जुहू येथील किशोर कुमार गार्डेन मध्ये पालिकेने घातलेल्या निर्बंध वरहि आदित्य ठाकरे यांनी सभागृहात लक्ष वेधून घेतले. पालिकेच्या या बागेत योगासने करू शकत नाहीत. व्यायाम आणि खेळ खेळू शकत नाहीत. दक्षिण मुंबईत कूपरेज मैदानाचे उदघाटन आपण केले तेव्हा आपला हेतू हाच हित की, या बॅगांमदजे मोकळा श्वास घेता यावा. जगात आणि देशात वर्ल्ड योग डे साजरा होत असताना आपण शहरातील योग्य बंद करील असल्याचे ही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आदित्य यांनी वेधले लक्ष : हवेची गुणवत्ता बिगडल्याने मुंबईकरांचा श्वास गुदमरला..
Published: