राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये शिवसेना भाजप यांच्या संबंधांबाबत केलेल्या टिप्पणीवरून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपलं मत त्यांच्या पक्षाबाबत व्यक्त करावं, आमच्या शिवसेनेची काळजी करू नये अशा शब्दात आरोग्य मंत्री सावंत यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्रामध्ये शिवसेना भाजप यांच्या संबंधाबद्दल टीका टिप्पणी केली आहे. यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावरून सावंत यांनी आज शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.