8.2 C
New York

राज्यात आणि केंद्रात मोठ्या उलथापालथी होणार, संजय राऊत यांचा मोठा दावा ……

Published:

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर देशात आणि राज्यात फार मोठ्या घडामोडी घडणार असल्यचा दावा केला आहे. या घडामोडी कधी घडतील त्याची तारीखही त्यांनी सांगितली आहे.सध्या सर्वच राजकीय पक्ष कर्नाटकातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही कर्नाटकात जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर म्हणजे 13 मे नंतर देशात आणि राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहेकर्नाटकाच्या निवडणुका होऊन जाऊ द्या. सर्वच राजकीय पक्ष हे कर्नाटकात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही कर्नाटकाच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. मीही 3 मे पासून सीमाभागात आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर देश आणि राज्यात मोठ्या घडामोडी होणार आहेत. 13 मे नंतर या घडामोडी घडणार आहेत, असा दावा करत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. 13 मे नंतर नेमक्या काय घटना घडणार आहेत हे मात्र राऊत यांनी सांगितलं नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related articles

Recent articles

spot_img