8.4 C
New York

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

Published:

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आरोपपत्र दाखल केलं आहे. दरम्यान या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख नसल्याची सूत्रांची माहिती आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीने आरोपपत्रातून अजित पवार, सुनेत्रा पवार यांची नावं वगळल्याची माहिती आहे. अजित पवारांशी संबंधित कंपनीविरोधात दोषारोपपत्र दाखल झालं आहे. मात्र प्रत्यक्ष अजित पवारांचं नाव नाही. दरम्यान याप्रकरणी अद्यापही तपास सुरु असल्याचं ईडीने कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे पुरवणी दोषारोपपत्रही दाखल होऊ शकतं अशी ईडीच्या सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ईडीने आत्तापर्यंत एकदाही अजित पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेलं नाही. अजित पवार यांनी मात्र नाव वगळ्याचं वृत्त फेटाळलं आहे. ईडी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. माझ्या माहितीनुसार चौकशी सुरु आहे असं अजित पवार म्हणाले आहेत .

Related articles

Recent articles

spot_img