दिल्ली सह महाराष्ट्रात देखील करोनाची ५०५ नवीन प्रकरणं समोर आली. मुंबईमध्ये २६२, पुण्यामध्ये ९०, औरंगाबादमध्ये ३९, नाशिकमध्ये १२, कोल्हापूरमध्ये ७ रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्याकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये करोनाचे सक्रिय रुग्ण ६०८७ वर पोहोचली आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ९६१६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ७२७६ सरकारी प्रयोग शाळांमध्ये आणि २१८५ खाजगी प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रामध्येही करोनाचा धोका वाढतोय. यावर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत.रम्यान, कोविडच्या वाढत्या केसाच्या पार्श्वभूमीवर तज्ञांचे म्हणणे की, पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. कारण, मध्यंतरामध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्यानंतर या आकडेवारीमध्ये घट होईल. आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात पुन्हा एकदा साथीच्या आजारांचा फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने हा आकडा कमीच आहे.