उल्हासनगरात मनसेने महावितरण कार्यालयात धडक दिली आहे. महावितरणकडून ग्राहकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.उल्हासनगरमध्ये मनसेनं महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणकडून अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिटची बिलं ग्राहकांना पाठवण्यात आली असून त्याची जोरजबरदस्तीने वसुली करत ग्राहकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेने याला विरोध केला आहे. दरवर्षी अशाप्रकारे डिपॉझिट बिल ग्राहकांना पाठवले जातात.
महावितरण कार्यालय
उल्हासनगरमधील वीज ग्राहकांना महावितरणने अव्वाच्या सव्वा अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिटची बिलं पाठवली आहेत. हे डिपॉझिट वसूल करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत ग्राहकांना त्रास देत असल्याचा मनसेचा आरोप आहे. याविरोधात मनसेनं उल्हासनगरच्या महावितरण कार्यालयात धडक दिली.
सिक्युरिटी डिपॉझिट न घेण्याची मागणी मनसेनं केली, सोबतच जर महावितरण कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही, तर मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे.