कोलकाता मेट्रोने बुधवारी इतिहास रचला आहे. देशात पहिल्यांदा नदीत बांधलेल्या बोगद्यातून हुबळी नदीतून कोलकाता हावडा मेट्रो धावली आहे. या प्रवासात केवळ अधिकारी आणि इंजिनिअर होते. ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हणत मेट्रोचे प्रमुख उदय कुमार रेड्डी यांनी या मार्गावर सेवा याच वर्षात सुरू होतील अशी शक्यता वर्तवली आहे. या मार्गावरुन सेवा सुरू झाल्यानंतर हावडा हे देशातील सर्वात जमिनीपासून खाली असलेलं मेट्रो स्टेशन बनेल. हावडा ते एस्प्लेनेडपर्यंतचा मार्ग जवळपास ४.८ किमी इतका लांब आहे, ज्यापैकी ५२० मीटर हुबळी नदीच्या खाली बोगद्यातून जाईल. हा बोगदा पाण्याच्या पातळीपासून ३२ मीटर लांब आहे. या बोगद्याची लांबी १०.८ किमी अंडरग्राउंड आहे. नदीखाली मेट्रोसाठी दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी हा एक खास अनुभव असणार आहे. एक मिनिटाहून कमी वेळेत जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत पाण्याखालून ही मेट्रो जाणार आहे.लंडन आणि पॅरिसमध्ये धावणाऱ्या युरोस्टार ट्रेनप्रमाणे कोलकातामध्ये मेट्रोसाठीचे बोगदे तयार करण्यात आले आहेत. Afcons ने एप्रिल २०१७ मध्ये बोगदे खोदण्यास सुरुवात केली आणि त्याचवर्षी जुलैमध्ये हे काम पूर्ण केलं. आज या मेट्रोची ट्रायल करण्यात आली. हा अतिशय ऐतिहासिक क्षण होता