राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर आहे. पुढील आठवड्यात असणार का?, तापमान कसे असणार?. यासंदर्भात हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २६ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संकटातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळीचे संकट कायम असणार आहे
उष्णतेची लाट कशी असणार ?
एप्रिल महिना उन्हाचा तडाखा चांगला बसला. आता एप्रिलचा शेवटचा आठवडा चांगला जाणार आहे. हवामान खात्याने पुढील आठवड्याबाबत आपल्या अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार देशात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एप्रिल व मे महिन्यात राज्यात उष्णतेची लाट असते