8.8 C
New York

निष्ठावंतांच्या मनात शिवसेना हि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच…..

Published:

शिवसेना पक्षप्रमुख यांच्या खेडमधील प्रचंड ‘शिवगर्जना’ सभेपासून सुरू झालेला झंझावात अवघ्या महाराष्ट्रात घुमणार आहे. यामध्ये रविवारी गोरेगावमध्ये शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘शिवगर्जना’ सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे.गद्दार ‘मिध्यां’नी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरले असले तरी निष्ठावंतांच्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार ‘शिवगर्जना’ सभांचेही आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवार, 12 मार्च रोजी सायंकाळी गोरेगाव पूर्वेकडील छत्रपती संभाजी मैदानावर ‘शिवगर्जना’ सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोरेगाव, दिंडोशी व जोगेश्वरी विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांनी आज प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related articles

Recent articles

spot_img