7.4 C
New York

नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले ..

Published:

राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पुन्हा एकदा सरकार पाडण्यावरुन शिंदेगड आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेली बोलताना उद्ध ठाकरे म्हणाले, ‘आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो पण, देशातील लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रांसाठीच होत आहे. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत आहे. भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.’ आमच्या सरकारने काहीच कामे केली नाही, असे ते बोलतात. पण, आमच्या काळात जागतिक संकट आले होते. आज चार चार दिवसांनी गारपीट होते, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तरीदेखील शेतकऱ्यांना काही मिळतं नाही. हे उलट्या पायाचे सरकार आहे. आमचं सरकार नालायक असतं, तर एवढी लोकं आलीच नसती. आमच्या काळात आम्ही कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती. आजचे सरकार भूलथापा मारणारे सरकार आहे,’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

Related articles

Recent articles

spot_img