स्वतःच्या शहरामध्ये, जो स्वतःचा बालेकिल्ला मानायचे, ते आता मानत नाहीत. कारण मी त्यांना सांगितलं, चॅलेंज द्या, मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार, असं जाहीर आव्हान शिवसेना चे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. ते आज आज ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्ह काढण्यात आलेल्या जनप्रक्षोप मोर्चात बोलत होते ठाकरे म्हणाले, आमच्या मोर्चासाठी राज्य सरकारकडून 17 अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही? लोकशाही आहे की संपली? ज्यासाठी मोर्चा घेतला तर त्यांच्याविरोधात बोलायचं नाही का? त्यांचं कौतुक करायचं का? गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आधी आमचे नेते पोलीस आयुक्तांकडे गेले, तरीही तक्रार घेतली नाही, चिडून उद्धव ठाकरे गेले. पण पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. मी आता मोठं टाळं घेऊन आलो आहे, पोलीस आयुक्तालयाला घालणार आहोत आदित्य ठाकरेंनी हैदराबाद येथे युवकांशी संवाद साधला. ठाण्यातून लढलो तर चालेल का?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी ठाण्यातील तरुणाला विचारला. ठाण्यातून लढलेलं आवडेल, असं उत्तर विद्यार्थाने आदित्य ठाकरेंना दिलं