शिवसेना-संस्थापक श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांचे पुत्र आहेत.आदित्य ठाकरेसाहेब हे एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या महाराष्ट्रातील पर्यटन व पर्यावरण सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई, महाराष्ट्रातील महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आहेत.ते शिवसेनेच्या युवा संघटनेचे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली आहे.आज आपण आदित्य ठाकरे यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे कुटुंब? त्यांचे शिक्षण या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील आदित्य ठाकरे यांचा जन्म १३ जून, १९९० रोजी मुंबई मध्ये झाला. त्यांचे वडील उद्धव ठाकरेसाहेब आणि आई रश्मीताई ठाकरे यांचा मोठा मुलगा आहे. आदित्य यांच्या लहान भावाचे नाव तेजस ठाकरे आहे.महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आदित्य यांचे आजोबा आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष व संस्थापक राजसाहेब ठाकरे हे आदित्य यांचे चुलते आहेत. त्यांनी मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असताना बीए इतिहास पदवी मिळविली.
त्यानंतर त्यांनी के सी लॉ कॉलेज मधून मास्टर डिग्री घेऊन एलएलबी पदवी मिळविली ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकीसाठी निवडणूक लढविली आणि त्यानंतर ते विजयी झाले.
ते निवडणूक लढविणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्यही ठरले. ते ३० डिसेंबर २०१९ रोजी शिवसेना सरकारमध्ये पर्यटन, प्रोटोकॉल आणि पर्यावरणाचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती आहे. १० कोटी ३६ लाख रुपये बँकेत जमा केले आहेत.
त्यांच्याकडे २ व्यावसायिक स्टोअर्स आहेत आणि कर्जतकडेही काही एकर जमीन आहे. आदित्य ठाकरे हे BMW कार चे मालक आहेत. जवळपास त्यांच्याकडे १६ ते १७ करोड ची प्रॉपर्टी आहे. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष होते, ज्याची स्थापना १७ ऑक्टोबर २०१० रोजी झाली होती आणि ती भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडला विरोध करताना पर्यावरणवाद्यांसह या आंदोलनात आदित्य खांद्याला खांदा लावून सहभागी होते. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे सरकारने या कारशेडला स्थगिती दिली होती, जी नंतर एकनाथ शिंदे सरकारने उठवली व आरेमध्येच कारशेड बांधण्याचे नक्की केले .आदित्य ठाकरे यांना कविता करायला आवडतात. त्यांनी मुंबईची स्वच्छता आणि हरित वाहतूक यासह संबंधित कारणांसाठी प्रचारक म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. ते प्लॅस्टिक बंदीसाठी देखील जोर देत आहेत आणि मुंबईतील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहेत जे मुख्यत्वे त्यांच्या पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिके अंतर्गत येते. भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात येतो. या अनुषंगाने अनेकदा प्रयत्न केले गेले आहेत. भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन राजकीय पक्षांतील वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला ज्यांनी साथ दिली त्या भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे सज्ज झाले असून उद्या ते एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे हे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जातील. बिहारची राजधानी पाटणा येथे ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई तसंच शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि इतर काही प्रमुख पदाधिकारीही आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत. राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधात मोर्चेबांधणी?भाजपकडून केंद्रीय सत्तेचा वापर करून इतर राजकीय पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशभरातील विविध विरोधी पक्षांकडून वारंवार केला जात असतो. त्यामुळे भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात येतो. या अनुषंगाने याआधीही अनेकदा प्रयत्न केले गेले आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा देशव्यापी आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यात होणाऱ्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही हजेरी लावली होती. देशातील हुकूमशाही राजवटीविरोधात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची भूमिका तेव्हा आदित्य यांनी मांडली होती. आता ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याने भविष्यात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट दिसणार का, अशी चर्चा आता सुरू झाला आहे