10.3 C
New York

खेळताना अवघ्या 14 वर्षांच्या मुलाला आला हार्ट ॲटॅक …

Published:

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हार्ट ॲटॅक आला तेव्हा तो मुलगा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. मित्रांनी लगेचच त्याच्या वडिलांना याची माहिती दिली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केले. जिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले असता मुलाचा मृत्यू झाला. एवढ्या लहान मुलाला हृदयविकाराा झटका आल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
तेव्हा कुटुंबीयांनी त्याला तत्काळ फातिमा नगर येथील खासगी रुग्णालयात नेले. मुलाची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्डिॲक अरेस्टमुळे मुलाची प्रकृती बिघडली होती आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून नातेवाईक आणि डॉक्टरांची चौकशी केली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी नमूद केल्याचे वानौरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले. मात्र एवढ्या लहान वयाच्या मुलासोबत ही परिस्थिती का उद्भवली, काय घडले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. याप्रकरणी त्या मुलासोबत खेळणाऱ्या इतर मुलांचीही चौकशी करण्यात येत आहे.

Related articles

Recent articles

spot_img