खेड कृषी उत्पन्न बाजार समिती…. ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांचा गेली कित्येक वर्ष ताबा आहे. त्याच्याच हातातील सत्तेवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी फिल्डिंग लावलीये. राजकीय आखाड्यात भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र असताना पुण्यात आगळंवेगळं समीकरण तयार झालंय. इथे आघाडीत बिघाडी होऊन भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले असून त्यांना काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेचेही साथ लाभलीये. त्यामुळे या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचं समीकरणं नेमकं काय आहे? विरोधकांनी एकवटत दिलेलं आव्हान दिलीप मोहिते पाटलांना झेपणार का?