8.2 C
New York

अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला……

Published:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण करताना भंबेरी उडते, ते राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पंतप्रधान म्हणतात, लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, चुकत असेल किंवा माहिती नसेल तर नोट काढून ती वाचा, त्यावर काहीही बिघडत नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे घोटाळा करुन सत्तेत आले आहेत, त्यामुळे बोलतानाही त्यांचा घोटाळा होतो. राष्ट्रपतींना ते कधी पंतप्रधान म्हणतात. हे सरकार दगा-फटका देऊन सत्तेत आलं, जनता यांना धडा शिकवणार.अजित पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात वाचाळविरांची संख्या वाढली आहे. कोणीही काहीही बोलतोय. या प्रकारचा कारभार हा राज्य सरकारचा सुरू आहे. राजू शेट्टी यांनी सांगितलं की प्रशासनामध्ये बदल्यांचे दर ठरले आहेत. प्रत्येक टेंडर हे मंत्रालयातून ठरतात. हे त्या-त्या महापालिकांना परवडणाऱ्या नाहीत अजित पवार म्हणाले की, मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये, त्याचा मानसन्मान हा टिकवला तो बाळासाहेब ठाकरेंनी. मराठी माणून एकजुटीनं राहिला तो त्यांच्यामुळे. ही एकी काहीजणांच्या डोळ्यात खुपत होती. शहिदांच्या बलिदानातून ही मुंबई महाराष्ट्राला मिळालं आहे. आपण एकजूट राहून या सर्वांशी मुकाबला करण्याची गरज आहे.

Related articles

Recent articles

spot_img