सांगली जिल्ह्यातील खरसुंडी हे तीर्थक्षेत्र. श्री सिद्धनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटकातील भाविक भक्तगण भेट देऊन श्री नाथांचे दर्शन घेत असतात. प्रतिवर्षी पंधरा लाखाहून अधिक भक्तगण या तीर्थक्षेत्रास भेट देतात.
माणदेशाचा राजा म्हणुन प्रसिध्द आसलेल्या श्री सिद्धनाथ व माता योगेश्वरी यांची आज द्राक्षबागेची आरास दर्शवणारी पूजा उभारण्यात आली.
मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात श्री नाथांची गजारुढ पुजा उभारली.
तर माता योगेश्वरी यांची लाल रंगाच्या शालुमध्ये पुजा उभारली होती.. द्राक्षांचे वेल व घडांचीशोभिवंत आरास केली होती. हि पुजा पाहण्यास व नाथ दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली होती
या पूजेसाठी द्राक्ष बागायतदार भक्तगणाबरोबरच सुरज गायकवाड यांनी द्राक्ष पुरविली.
पुजा बांधण्यासाठी मंदिरातील पुजारी किशोर पुजारी, प्रतीक पूजारी ,सतीश भांगे ,किरण भांगे ,सुधीर गोडके, विजय गुरव ,प्रमोद पाटील ,तुकाराम पूजारी, राहुल गुरव यांनी परिश्रम घेतले
श्री सिद्धनाथ व माता योगेश्वरी यांची आज द्राक्षबागेची आरास दर्शवणारी पूजा…!
Published: