महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीनं सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडी शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि महीब्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडा शर्यती पार पडल्या. या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. सांगलीच्या भाळवणी येथे देशातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि कराडच्या रेठरेमधील महीब्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला. या बैलजोडीला चक्क थार गाडी भेट म्हणून देण्यात आली आहे. लाखो बैलगाडा शौकिनाच्या उपस्थितीत सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक …