राज्यात पुन्हा सत्तांतराचे वारे वाहू लागलेत की काय? अशा चर्चा आहेत. पवारांच्या बदलत्या भूमिकांमुळे भाजप-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा ताकद एकवटली आहे. आता जाणाऱ्यांची पर्वा न करता आम्ही संघर्ष करू, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, पवारांचीही हीच भूमिका असून आम्ही महाराष्ट्रभर फिरू, रान उठवू आणि. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणू असंही राऊत म्हणाले. ठाकरे-पवारांचं एकमत असून, जे सोडून जातील ते राजकीय आत्महत्या करतील असंही म्हणाले.