आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी रविवारी (२४ एप्रिल) माध्यमांशी संवाद साधला.गिरीश बापटांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता उमेदवार देणार का?, असा प्रश्न विचारला असता आम्ही उमेदवार देणार नसून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असं आठवले म्हणाले. तसेच, अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्यच्या इच्छेवरही रामदास आठवले यावेळी बोलत होते. अजितदादांना मविआमध्ये असताना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही, असं आठवले म्हणाले. तसेच, अजितदादा, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबतच यावं लागेल, असंही सांगितलं. अजितदादा कितीही म्हटले तरी भूकंप होणार हे निश्चित, असेही संकेत यावेळी आठवलेंनी दिले आहेत