10.7 C
New York

पैसे देऊन माणसं परत येणार का ?

Published:

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रखरखत्या उन्हात बसलेल्या 12 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. पैसे देऊन आमची माणसे परत येणार आहेत का? असा टाहो कळव्यातील दोन मृतक आईंच्या मुलींनी सरकारकडे फोडला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या आईचा जीव गेला असल्याचा आरोप आता मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित करताना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते. शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. परंतु कार्यक्रमात भर उन्हात श्री सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवले. परिणामी 12 श्री सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. कळवा परिसरात राहणाऱ्या भीमा साळवी तसेच पुष्पा गायकर या देखील या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताच्या बळी ठरल्या आहेत

Related articles

Recent articles

spot_img