मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी सुभाष देसाई, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, सुनील प्रभू हेही उपस्थित होते. बोलताना मन की बात नको, दिल की बात हवी, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. उत्तर भारतीयांशी नातं मजबूत करायला आलो असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ऐकमेकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे, असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर वाईट वेळ होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा बचाव केला होता, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.