9.8 C
New York

ठाणे ते पनवेल मार्गावरील दिघा स्थानक बांधून पूर्ण . . .

Published:

 ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचेबांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या नव्या स्थानकाचे उदघाटन नेमके केव्हा होणार याची मुंबईकरांना प्रतिक्षा लागली आहे. दिघा रेल्वे स्थानकाच्या सेवेत येण्यामुळे कळवातसेच विठावा, पारसिक हील परीसरातील ज्या नागरीकांना वाशी-पनवेलसाठी ठाणे स्थानकापर्यंत यावे लागते त्यांना आता दिघा स्थानकावरुन पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे. पाहूया काय आहे.

दिघा स्थानक हा 476 कोटी रुपयांच्या ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंकचा एक भाग आहे. या ऐरोली ते कळवा एलिवेटेड प्रकल्पामुळे कल्याणहून नवीमुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकात न उतरता कळवा येथे उतरून ट्रान्सहार्बरची लोकल पकडता येणार आहे. परंतू ऐरोली ते कळवा एलिवेटेड प्रकल्पा हा प्रकल्प पुनर्वसनाच्या भिजत घोंगड्यामुळे वर्षांनुवर्षे रखडला आहे. त्यामुळे आता केवळ ठाणे ते पनवेल-वाशी मार्गावरील दिघा स्थानक उघडून समाधान मानले जाणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ एमयूटीपी – 3 अंतर्गत दिघा स्थानकाचे बांधकाम करीत आहे. या स्थानकाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. केवळ शेवटचा हात मारणे सूरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अनेक रेल्वे प्रकल्पांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related articles

Recent articles

spot_img