तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील प्रसिद्ध सिद्धनाथ चैत्र यात्रा नियोजन आढावा बैठक प्रांता अधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी तहसीलदार बाई माने विभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम ,आटपाडी पोलीस निरीक्षक शरद नेमाणे सरपंच धोंडीराम इंगवले ,देवस्थान चे चेअरमन चंद्रकांत पुजारी मानकरी ,व्यापारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
यात्रा काळात संबंधित विभागाचे काय नियोजन करावे याबाबत मार्गदर्शन केले यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भाविकांनी व्यापारी मानकरी यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी संतोष भोर यांनी केले .यात्रा काळात कायदा सुव्यवस्था अडथळा निर्माण केल्यास कोणाची गय केली जाणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस विभागीय अधिकारी पद्मा कदम यांनी सांगितले आरोग्य विभागाने पुरेसा औषध उपलब्ध आरोग्य सेवा सज्ज ठेवला जाईल याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांनी सांगितलं भाविकांची साठी यात्रा काळात जादा एसटी बस सोडणार असल्याचे एसटी विभागाने सांगितले. मार्केट कमिटी ,देवस्थान ग्रामपंचायत संयुक्त पणे येणाऱ्या भाविकांना सोइ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगण्यात आले यावर्षी बैल बाजार तळं सालाबादप्रमाणे मंदिर परिसराच्या पाठीमागच्या बाजूने झरे , वलवण ,कामथ ,चिंचाळे रस्त्याच्या बाजुला भरणार आल्याचे मार्केट कमिटी व ग्रामपंचायत वतीने जाहीर करण्यात आले
खरसुंडी येथील प्रसिद्ध सिद्धनाथ चैत्र यात्रेचे नियोजन
Published: